रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईद गडहिंग्लज मध्ये अत्यंत उत्साही वातावरणात साजरी झाली.अत्यंत प्रखर उष्मा असून देखील मुस्लिम बांधवांनी कडक रोजे केले. सकाळी ईदगाह मैदानावर सात हजार पेक्षा जास्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी मौलाना मेहबूब रजा यांनी खुतबा पठण केले. नमाज पठ नानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचे एकता टिकून राहावी, सामाजिक सलोखा, सर्व प्रकारच्या आपत्ती व संकटापासून देशाचे रक्षण व्हावे यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून सर्वांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संतोष चिकोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना जिलेबीचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आम्ही भारतीय गडहिंग्लजकर संघटनेचे डॉक्टर एम.एस. बेळगुद्री, गणपतराव पाटोळे, साताप्पा कांबळे, सिद्धार्थ बन्ने,कुमार पाटील, युवराज बर्गे, धनंजय शेटके इत्यादींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सुन्नी जुम्मा मस्जिद गडहिंग्लजचे प्रेसिडेंट मंजूर मकानदार, इर्शाद मकानदार, अल्ताफ शहाणी दिवाण,दादा जे. एम.ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांचे आभार युनिस नाईकवाडे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments