चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : तावरेवाडी (ता.चंदगड ) येथील परशराम धोंडिबा कागणकर (वय - 75) यांचा कौउल नावाचे शेतालगत असणाऱ्या ताम्रपर्णी नदीपात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाला.सदरील व्यक्ती बुधवार दि.19 मार्च पासून बेपत्ता असल्याची चंदगड पोलिसांत नोंद केली होती.सोमवारी सकाळी सुभाष पाटील हे पाण्याची मोटार चालु करण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली.याची वर्दी सुभाष गुंडू पाटील यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुरणे करत आहेत.
Post a Comment
0 Comments