चंदगड प्रतिनिधी : देवरवाडी (ता.चंदगड ) येथील प्रमोद प्रभाकर बर्वे (वय -32)यांनी मंगळवार (18 मार्च )रोजी आपल्या राहत्या घरी तणनाशक ट्यूनिक प्राशन केले.त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना बेळगांव येथील के. एल. ई. हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.पण एकंदरीत उपचार घेत असताना तब्येतीमधे कोणातही फरक न पडल्याने त्यांचा आज सोमवार दिनांक 24 मार्च रोजी मृत्यू झाला.याबाबतची वर्दी के.एल. ई. हॉस्पिटल बेळगावचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांनी दिले असून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करत आहेत.
Post a Comment
0 Comments