कोल्हापूर/प्रतिनिधी : काही दिवसापुर्वी प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती.याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने कोरटकर फरार होता.जामीनासाठी त्याने कोल्हापूर कोर्टात धाव घेतली होती पण कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
कोल्हापूर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.पोलीस त्याचा शोध घेत होते.अखेर तो तेलंगणात सापडला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रशांत कोरटकर हा गेल्या महिन्याभरापासून फरार होता.अखेर त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Post a Comment
0 Comments