Type Here to Get Search Results !

नेसरी येथे शनिवारी खेळ पैठणीचा कार्यक्रम.

# महिलादिनी सरपंच गिरिजादेवी शिंदे यांचे आयोजन 

# पुरस्कार, खेळ, बक्षिसे, सेलिब्रेटी आणि खाद्य महोत्सवाची मेजवानी

नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : नेसरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे यांच्यावतीने शनिवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता नेसरीकरांचा खेळ पैठणीचा' पर्व तिसरे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पुरस्कार वितरण खेळ,खाद्य महोत्सव व सेलिब्रेटिंची मांदियाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने असणार आहे. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी सरपंच गिरिजादेवी शिंदे यांच्या वतीने महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष असून यामध्ये 'महाराणी ताराराणी साहेब' नेसरी आयडॉल पुरस्कार महिला किंवा युवतीला दिला जातो. तसेच मान नेसरीकरांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमातून विविध खेळांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर व कलर्स मराठी फेम सेलिब्रिटी अँकर नितीन गवळी महिला वर्गासाठी विविध खेळ व मनोरंजन घेवून येत आहेत.

या खेळात सहभागी झालेल्या महिला विजेत्यांना प्रथम क्रमांकास कपाट व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांक डबल ड्रेसिंग टेबल व मानाची पैठणी, तृतीय क्रमांक सिंगल ड्रेसिंग टेबल व मानाची पैठणी, चतुर्थ क्रमांक सोन्याची नथ व सन्मानचिन्ह, पाचवा क्रमांक कोल्हापुरी साज व सन्मानचिन्ह बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय लकी ड्रॉ मधूनही महिलांसाठी भेटवस्तू देण्यात येणार आहे.तर या निमित्ताने सिने अभिनेत्री व झी मराठी वाहिनीवरील 'लागीर झालं जी' मधील जयडी भूमिका साकारलेली किरण ढाणे तसेच रील स्टार अक्षय चौगुले व प्रज्ञा चौगुले या कार्यक्रमास खास उपस्थित राहणार आहेत. तर खाद्य महोत्सव अंतर्गत या ठिकाणी दुपारपासून रात्रीपर्यंत विविध खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. तरी या कार्यक्रमाचा उपस्थित राहत आनंद घेण्याचे आवाहन सरपंच गिरिजादेवी शिंदे यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments