रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : विद्या मंदिर निढोरी तालुका कागलचे मुख्याध्यापक गुंडू यल्लाप्पा कांबळे यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यप्रणित कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा कोल्हापूर यांच्यावतीने दिला जाणारा सम्यक कार्यसम्राट आदर्श शिक्षक 2025 हा पुरस्कार जाहीर झाला असून शनिवार दिनांक 8 मार्च रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
गुंडू कांबळे यांनी 1986 रोजी आपल्या नोकरीची सुरुवात केली असून विद्या मंदिर पार्ले, विद्यामंदिर ढोलगरवाडी, विद्या मंदिर मांडेदुर्ग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागिलगे, विद्या मंदिर व्हणाळी तालुका कागल, या ठिकाणी त्यांनी काम केले आहे.त्यांनी केलेले शैक्षणिक योगदान पाहता या निवडीनंतर त्यांना सर्वच माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Post a Comment
0 Comments