रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : नांदवडे तालुका चंदगड येथे गोवा बनावटीचा दोन लाखाचा दारू साठा जप्त करण्यात आला.बेकायदेशीरपणे दारूसाठा विक्रीसाठी ठेवल्या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती माहिती अशी की,नांदवडे येथे 2 लाख 12 हजार 930 रुपयांची दारू साठा केल्याप्रकरणी आशा धर्मनाथ गावडे (वय - 46 रा.नांदवडे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावडे ही महाराष्ट्र शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या सीलबंद बाटल्या स्वतःकडे विक्री परवाना नसताना बाळगल्या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ )(ई ) 90, 108 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आंबुलकर हे करत आहेत.
Post a Comment
0 Comments