Type Here to Get Search Results !

पुरस्कार प्राप्त झाल्याने माणसाच्या जबाबदाऱ्या वाढतात-प्रताप नागेनट्टी

(चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने निट्टुर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न)

चंदगड प्रतिनिधी : मराठी भाषा गौरव दिनाच्य निमित्ताने सन २०२४- २५ चा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचा 'मराठी प्रेरणा पुरस्कार'नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित नरसिंह हायस्कूल निट्टूर चे मराठी विषयाचे तज्ज्ञ  अध्यापक,अध्यापक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रताप नागेनट्टी यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. आर. भाटे होते.प्रास्ताविक रविंद्र पाटील यांनी केले. यावेळी बोलताना सत्कारमूर्ती प्रताप नागेन्टी म्हणाले,पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे व्यक्तीची गुणवत्ता वाढते त्याचप्रमाणे जबाबदारीही वाढत असते . एखाद्या व्यक्तीने आयुष्यात केलेल्या आपल्या कार्याचे फळ त्याला या पुरस्काराच्या रूपाने मिळाल्याने कामाचा उत्साह वाढतो. शिवाय नव्याने अधिक जोमाने काम करण्याचा प्रेरणा मिळत असते. पुरस्काराने समाजामध्ये माणसाच्या कार्याची मूल्यमापन निश्चितच होत असते त्यामुळे पुरस्कार मिळवण्यासाठी आपली पात्रता निर्माण केले तरच पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला खरोखर समाधान लाभेल अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळी राघवेंद्र इनामदार,महादेव शिवणगेकर, सुभाष बेळगावकर यांनी मनोगते व्यक्त केली. " पुरस्कार प्रेरणा देतात. आणि प्रेरणेने व्यक्तीमत्व घडतात."असे प्रतिपादन सत्कारमुर्ती प्रदिप नागेनट्टी यांनी केले.

या कार्यक्रमाला अध्यापक संघाचे  बी एन पाटील,राजेंद्र शिवनगेकर,संजय साबळे,मोहन पाटील, एस.पी. पाटील, कमलेश कर्निक,अनंत पाटील, व्ही.एल. सुतार, एच.आर. पाऊसकर सौ. पूजा नागेनट्टी व मराठी अध्यापक परिवारातील सर्व पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.कार्यकमाचे सूत्रसंचालन आर. जे. मस्कर यांनी तर आभार एस.एम.विभूते यांनी मानले.





Post a Comment

0 Comments