मुंबई/प्रतिनिधी : अंतिवडे ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथील ग्रामपंचायत सदस्या आणि माणूस फाउंडेशन च्या संचालिका संज्योत धम्मरक्षित यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत मुंबई महाराष्ट्रातील युवक यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार त्यांचे पती संदीप धम्मरक्षित यांनी स्विकारला.याआधी त्यांना महाराष्ट्रातील अनेक नामवंत पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा चेंबूर मुंबई येथे उत्साहात पार पडला.यावेळी महाराष्ट्रातील युवक, युवती मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments