चंदगड प्रतिनिधी/राजेंद्र शिवणगेकर : कोकणाप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यामध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.होळीसणाच्या निमित्याने विविध लोककला प्रकार परंपरेने संस्कृतीचा भाग म्हणून सादर केले जातात. या लोककलेचे संवर्धन आणि जतन झाले पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीने दखल घेऊन 'धोरण समिती २०२४ (पुनर्विलोकन) मध्ये चंदगड तालुक्यातील सिमगोत्सव सोंग लोककला प्रकार, नमन, खेळे, रोबोट यासारख्या कला प्रकारच्या संवर्धन जाताना झाले पाहिजेत. असे संस्कृतीक धोरणा समितीने शिफारस केली आहे. याचा फायदा चंदगड आणि आजरा तालुक्यातील सोंग लोककला आणि लोककलावंतांना होणार आहे.
चंदगड तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटक आणि पश्चिमेला कोकण अशा दोन संस्कृती लाभले आहेत. त्यामुळे येथील लोककला आणि संस्कृती वेगळी असलेली पहावयास दिसून येते. चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील चंदगड, कोकरे उमगाव, जांबरे, हेरे, पाटणे, नांदवडे,, काजिर्णे, कानूर, गवसे, पुंढ़ा, भोगोली, सडेगुडवळे या भागात मोठ्या प्रमाणात होळी सणानिमित्य शिमगोत्सव सोंग लोककला प्रकार नमन, खेळे, रोबोट यासारख्या कला साजरा केले जातात. हा शिमगोत्सव काही भागात सातदिवस, पंधरादिवस आणि एकवीस दिवसचा परंपरेने शिमगोत्सव साजरा केला. जातो. या दिवसामध्ये वेगळ्या प्रकारच्या लोककला प्रकार सादर केले जातात. नमन खेळ, खेळे, रोबोट आणि सोंग या लोककला प्रकारचे विशिष्ट आकर्षण असते. बदलत्या काळानुसार ही लोककला टिकली पाहिजेत. या कलाप्रकारांचे संवर्धन जतन व्हावे. या उद्देशाने महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीने धोरणात मांडली आहे. चंदगडी सोंग लोककला प्रकार जपणारे कलावंत आणि सांस्कृतिक मंडळे यांचेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
चंदगड आणि आजरा तालुक्यातील लोककला सोगे लोककला संवर्धनासाठी शासनाच्या वतीने नवीन धोरणामध्ये याचा समावेश करण्यात आला असून शिमगोत्सव सोगे या लोककलांच्या संवर्धन जतनासाठी विशेष तरतूद करण्यात यावी अशी शिफारस धोरण समितीने केली.. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील लोककला आणि कलावंतांनासाठी ही आंनदाची बाब आहे.
चंदगडच्या शिमगोत्सवचा सोंग कलाप्रकारचा धोरणामध्ये समावेश-
डॉ. दौलतराव कांबळे(लोककलेचे अभ्यासक व सांस्कृतिक धोरणा लोककला उपसमिती सदस्य)
चंदगड तालुक्यातील सोंगे लोककला प्रकाराचा महाराष्ट्र राज्याच्या नवीन सांस्कृतिक धोरणामध्ये समावेश केल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण लोककला उपसमितीचे सदस्य डॉ. दौलतराव कांबळे यांनी दिली. दौलतराव कांबळे हे कोकरे तालुका चंदगड येथील सुपुत्र आहेत. त्यांनी येथील लोककला पाहिले असून ते लोककलेचे अभ्यासक आहेत. या लोककलेंचा समावेश धोरणामध्ये व्हावा असा धोरण समितीला आग्रह केला आणि येथील वेगळी लोककला संस्कृती परंपरा त्यांनी समिती समोर मांडल्यामुळे नवीन सांस्कृतिक धोरणामध्ये चंदगडतील शिमगोत्सव सोंगे लोककला प्रकारचा समावेश केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
Post a Comment
0 Comments