चंदगड/प्रतिनिधी : केवळ चंदगड तालूकाच नव्हे तर कोल्हापूर जिल्हामध्ये अतिक्रमण हटवणे व पाणंद रस्ते खुले करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या व लेडी सिंघम म्हणून सर्वांना परीचित असणाऱ्या हेरे मंडल अधिकारी राजश्री पचंडी यानी शिप्पूर (ता चंदगड ) येथील अतिक्रमनाच्या विळख्यात सापडलेला पाणंद रस्ता खुला केला.
मौजे शिप्पूर येथील गट नंबर 94 नदीपासून ते गट नंबर 12 पर्यंतचा पाणंद रस्ता गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता.काही ठिकाणा या रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले होते.रस्ता नसल्याने शेती मशागत व ऊस वाहतूक करताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.शेतकऱ्यांची हिच अडचण लक्षात घेऊन मंडळ अधिकारी राजश्री पचंडी यानी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तंटामुक्त अध्यक्ष बंडोपंत पाटील,विलास पाटील,ग्राम महसूल अधिकारी अंकुश लाटकर, पोलीस पाटील,सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा रस्ता खुला करण्यात आला.याप्रसंगी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी भेट देऊन सर्व शेतकरी बांधवांचे कौतुक करून रस्ता खूला करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.तसेच सदर रस्ता खुला करण्यास तहसीलदार चंदगड राजेश चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हा रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले.
Post a Comment
0 Comments