चंदगड/प्रतिनिधी : पाटणे वनविभागावर शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद यांनी चंदगडला भेट दिली.तसेच या पार पडलेल्या बैठकीत सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.व प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा केली.आपल्या प्रशासनाकडून सर्व मदत शेतकऱ्यांना पुरवली जाईल व येणाऱ्या तीन-चार दिवसांमध्ये सर्व मागण्या शासनाच्या दप्तरी पाठवून 15 तारखेनंतर शेतकऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले,पाटणे वन विभागाचे प्रमुख प्रशांत आवळे,सामाजिक कार्यकर्ते संतोष मळविकर,विवेक गावडे,सोमनाथ चांदेकर,सुधाकर गावडे,शामराव गावडे,अनिल गावडे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments