चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : पर्यावरणातील होणाऱ्या बदलामुळे चिमण्यांच्या वास्तव्याला आता धोका निर्माण झाला असून त्यांना वाचविण्यासाठी सर्व दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत.यासाठी विद्यामंदिर बेरडवाडा वरगाव येथे 20 मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी वर्ड फॉर नेचरचे चंदगड तालुका संघटक जोतिबा जोशीलकर प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थित होते.
आग, वणवा यापासून होणाऱ्या मूक प्राण्यांचे व पक्षांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून वनराई व पक्षी टिकले तरच मानव जातीचे रक्षण होईल असे मत टी.एस.नाईक यांनी व्यक्त केले.यावेळी चंदगड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जी. वाय. कांबळे,मुख्याध्यापक बाबुराव वर्पे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.शेवटी आभार विलास सुतार यांनी मानले.
Post a Comment
0 Comments