नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : तारेवाडी येथील 42 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या श्री.लिंगदेव दुध संस्थेला गोकुळचे संचालक युवराज पाटील,नावेद मुश्रीफ, किसन चौगुले यांनी भेट देऊन दुधवाढ,कामकाजातील अडचणीवर सखोल चर्चा केली.कार्यक्रमामधे उपाध्यक्ष दिनकर पाटील अध्यक्षस्थानी होते.संचालक चौगुले, पाटील, मुश्रीफ यांनी गोकुळच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन दुध उत्पादकांचे प्रश्न जाणून घेतले.माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पाटील यांनी स्वागत तर सचिव संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी जिल्हा दुध सहसंकलन अधिकारी कृष्णकांत आमटे, पशु संवर्धन अधिकारी अविनाश जोशी, पशुवैद्यकिय अधिकारी संजय गावडे, तालुका दुध संकलन अधिकारी बापूसाहेब देसाई, सुपरवायझर अनिल पवार, संजय पाटील, जयवंत दावणे, बाबूराव धुमाळे, ज्ञानदेव पाटील, गिरीश रेडेकर, राजन पाटील, परशराम देसाई, संगिता पाटील, अंजना पाटील, वैजयंता पाटील, महेश तुपूरवाडकर,आदर्श पाटील आदी उपस्थित होते. सोनिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक संभाजी मेटकर यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments