Type Here to Get Search Results !

जनसेवक नरसू शिंदे यांनी स्वखर्चाने अनेक कुटुंबाला दिला रोजगार

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : समाजसेवक नरसु शिंदे यांनी वंचित घटकातील लोकांना स्वतःच्या पायावर उभे रहावे याकरिता दुकाने घालून त्यांना रोजगार मिळवून दिला आहे.खेड्यातील अनेक तरुण बेरोजगार फिरत आहेत,तर काहीजण व्यसनाधीन होत आहेत.त्यामुळे बेकारीची समस्या वाढत चालली आहे.कुटुंबाचा आर्थिक स्तर सुधारावा म्हणून संजय लोखंडे सारख्या अनेक तरुणांना नरसु शिंदे यांनी दुकाने घालून दिले आहे.लोखंडे यांना 'लोखंडे अँटो वर्क' नावाचे दुकान सुरू करून पुन्हा एकदा समाजसेवक नरसु शिंदे यांच्या माणुसकी व सामजिक कार्याची पोचपावती समोर येते.त्याशिवाय त्यांनी अधिक महिलांना गावरान कुकुटपालन व्यवसाय काढून दिले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन  सुरेश बूगडे यांच्याहस्ते झाले.यावेळी सुरेश गवळी, भिकाजी गोंधळी, आनंदा सूतार, अभिजीत कुंभार,डॉ. खवरे, संजय पाटील ,अण्णा सुतार संतोष सुतार,महादेव होडगे, चंद्रकांत सपकाळ,विशाल गुरव आदी.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments