Type Here to Get Search Results !

चंदगडला लालपरी न मिळाल्यास आंदोलन.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : चंदगड डेपो मध्ये असणाऱ्या सध्याच्या बसेस ह्या नादुरुस्त असल्या कारणाने खेडोपाडी प्रवास करत असताना प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.अपुऱ्या बस पुरवठामुळे बऱ्याच गावांमध्ये अजूनही महामंडळाची बस धावत नाही. बेळगावला जाणाऱ्या बसेस अपुऱ्या असल्याने अचानक रद्द केले जातात.याबाबतची लेखी व तोंडी तक्रार देऊन देखील दिलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शासनाकडून तात्काळ लाल परी बसेस चंदगड विभागासाठी मागून घ्याव्यात अन्यथा आंदोलन करणार असल्याचा ईशारा एडवोकेट संतोष मळवीकर यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.

सदर निवेदनातून एडवोकेट संतोष मळवीकर,सुनील नाडगोडा, अनिल गावडे, प्रकाश गावडे, परशराम मळवीकर, तुकाराम शिंदे, देवानंद गावडे, प्रकाश गावडे यांनी निवेदनातून चंदगड आगार प्रमुख व शासनाकडे नवीन बसची मागणी केली असून विषय मार्गी न लागल्यास आंदोलनाचा पवित्रा नागरिकांकडून घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments