Type Here to Get Search Results !

पिळणी येथे श्री.देव रवळनाथ मंदिर वास्तुशांती व कळशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात.

 

चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील पिळणी येथे श्री.देव रवळनाथ मंदिर वास्तुशांती व कळशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास चंदगड तालुक्यातील भाजपा नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी उपस्थिती लावली.यावेळी देवस्थान कमिटी व पिळणी ग्रामस्थांच्या वतीने संग्रामसिंह त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी पिळणी सरपंच राजू चव्हाण,प्रकाश बुवा, पांडुरंग पाटील पोलीस पाटील,तुकाराम पाटील, संदीप बांदेकर पोलीस पाटील कानूर,कुलदीप येर्लेकर, राजू गणांचारी, कृष्णा गणांचारी, प्रकाश गुरव, दिनकर डवरी, विष्णु डवरी, कृष्णा डवरी यांच्यासह पिळणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments