चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : तेऊरवाडी(ता.चंदगड)येथील नारायण रामा पाटील(वय 58) हे 5 एप्रिल पासून बेपत्ता असल्याची फिर्याद वसंत रामा पाटील यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.नारायण रामा पाटील यांची उंची 5 फूट 2 इंच, अंगाने सड पातळ, रंगाने निमगोरा, सरळ नाक, गोल चेहरा, अंगात निळा शर्ट व खाकी फुल पॅन्ट असलेल्या व्यक्ती संदर्भात काही माहिती मिळाल्यास चंदगड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल जमीर मकानदार यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments