चंदगड प्रतिनिधी : केंद्रीय प्राथमिक शाळा अडकूर येथे विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन शाळा व्यवस्थापन कमिटी कडून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष दिलीप भेकणे होते.यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरोप समारंभ निमित्त शाळा व शिक्षकांच्याबद्दल असणारे ऋण व्यक्त करणारी भाषणे केली.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष विद्याताई आंबिटकर, सरपंच सचिन गुरव, केंद्रप्रमुख डी. एस. पाटील, अमृत देसाई, विशाल कुट्रे, लक्ष्मण चौगुले, अमित हुसेन कर, प्रियंका संकपाळ, वर्षा वाडेकर, राधिका चौगुले, सोनाली कांबळे, गीतांजली घोडके यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.