चंदगड प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्याचे मुखपत्र उल्हास प्रभात दैनिकाच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना त्या-त्या क्षेत्रातील रत्न म्हणून गौरविण्यात येते.यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून ऍड.संतोष मळवीकर यांनी लिहिलेल्या संत्या कुली पुस्तकासाठी 'साहित्यरत्न पुरस्कार 2025' जाहीर करण्यात आला.“स्वतःसाठी सगळेच जगतात, पण इतरांसाठी जगण्याची मजा काही औरच आहे,” असे म्हणणार्या अँड संतोष मळवीकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते आनि 'रोखठोक आवाज' या वृत्तपत्राचे संपादक म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहेत.गोरगरिबांकरिता अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा समाजसेवक अशी त्यांची ओळख सर्वश्रुत आहे.
आतापर्यंत विविध ज्वलंत सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडल्यामुळे अनेक ठिकाणी दखलपात्र,अदखलपात्र,शासकीय नुकसान भरपाई,अब्रू नुकसान भरपाई, शासकीय कामात अडथळा असे 170 च्या वर गुन्हे यांनी स्वतःच्या अंगावर घेतले आहेत.पत्रकारितेबरोबर त्यांनी लिहिलेल्या आत्मकथनला संत्याकुली वाचकांचा प्रचंड प्रतिसाद भेटत आहे.अवघ्या एक महिन्यात दुसरी आवृत्ती वाचकांच्या हाती आली आहे.सोबतच त्यांच्या या आत्मकथनाला वेगवेगळ्या ठिकाणाहून पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.एक वकील,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आनि लेखक म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, युवा पिढीसाठी प्रेरणास्थान असलेल्या मळवीकर यांना साहित्यरत्न 2025 ह्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या 18 एप्रिल रोजी बदलापूर जिल्हा ठाणे येथे आमदार किशन कथोरे,दैनिक सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले,परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले,बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.अशी माहिती उल्हास प्रभातचे संपादक डॉक्टर गुरुनाथ बनोटे यांनी दिली आहे.
'संत्या कुली' या 'आत्मकथनाला' नुकताच बळीराजा प्रतिष्ठान' शेळवे पंढरपूर यांच्यातर्फे' रान शिवार' या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तत्पूर्वी छत्रपती शाहू प्रतिष्ठान यांच्यातर्फे' कोल्हापूर रत्न' तर अखिल भारतीय मानवधिकार संघटने कडून अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.ठाण्यामधून मळवी यांना जाहीर झालेल्या साहित्यरत्न पुरस्कारामुळे सर्वत्र कौतुक होत आहे
Post a Comment
0 Comments