Type Here to Get Search Results !

रविवारी दाटे येथे ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळावा.

चंदगड/प्रतिनिधी : ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुख,शांती व समाधानासाठी प्रयत्न करणारी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ ही राज्यात सर्वात मोठी संघटना आहे.या संघटनेच्या ध्येयधोरणानुसार चंदगड तालूका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीने ज्ञानेश्वर-माऊली मंदीर दाटे (ता.चंदगड ) येथे रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ .३० वाजता ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न , समस्या , आरोग्य , प्रवास सवलत , गोरगरीब वशेतकऱ्यांना  पेन्शन मिळावी  ,मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा सर्व मात्र ज्येष्ठ नागिरांना लाभ मिळावा, ज्येष्ठांचा होणारा छ्ळ , त्यांचे प्रश्न , समस्यासह विविध मागण्याबाबत तालूक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत संवाद साधन्यासाठी स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे.तरी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी या स्नेहमेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव आर.आय .पाटील यांनी केले आहे.


यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीकडून चंदगड तालुक्याचे तहसिलदार राजेश चव्हाण, चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, एस टी. डेपो मॅनेजर संतोष पाटील यांना चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीने भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली. 


Post a Comment

0 Comments