Type Here to Get Search Results !

बेकायदेशीर लाकूड वाहतुकीवर वन विभागाची कारवाई

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : उमगाव-जांबरे परिसरात गस्त घालत असताना बेकायदेशीर जळावू लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये पाच लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी वनपाल कृष्णा डेळेकर व वनरक्षक मौला मुबारक सनदी हे फायर वॉचर विठ्ठल धुरी व सौरभ सावंत सह गस्त घालत असताना जांबरे गावच्या हद्दीत विनापरवाना जळाऊ लाकूड वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी ट्रॅक्टर चालक विशाल अशोक कुंदेकर व ट्रॅक्टर मालक अशोक महादेव कुंदेकर यांना परवाना विषयी विचारण्यात आले असता त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्रे नव्हती. यावेळी अधिक चौकशी केली असता त्यांनी चंदगड येथील बशीर रसूल मदर याच्या सांगण्यावरून हा लाकूड माल वाहतूक करत असल्याची कबुली दिली.यानंतर वन विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर ट्रॉली सह जळाऊ लाकूड जप्त केली.


याप्रकरणी विशाल अशोक कुंदेकर ( वय 25 राहणार,शिरगाव तालुका चंदगड ) आणि अशोक महादेव कुंदेकर ( वय 52 राहणार शिरगाव तालुका चंदगड ) यांना ताब्यात घेण्यात आले असून बशीर रसूल मदार ( वय 58 राहणार चंदगड ) याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी वनरक्षक जांबरे यांनी भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपवनरक्षक जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले, वनपाल कृष्णा डेळेकर व वनरक्षक मौला मुबारक सनदी करत आहेत.

Post a Comment

0 Comments