आजरा प्रतिनिधी/पुंडलीक सुतार : उत्तूर ता.आजरा येथे 13 एप्रिलला कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघ वतीने हनुमान मंदिरात सांस्कृतिक कला महोत्सव साजरा होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला लोक कलाकार संघाचे अध्यक्ष विलासराव पाटील,सरपंच किरण आमणगी,उमेश आपटे,वसंतराव धुरे,शिरीष देसाई,महेश सरदेसाई आदी मान्यवर हजर राहणार आहेत.
शाहीर राजाराम कोपटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.सदर कार्यक्रमात विविध कलाकारांनी उपस्थित राहून आपली कला सादर करावी असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.कार्यक्रमात उपस्थित कलाकारांना प्रमाणपत्र व ग्रुपला प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
Post a Comment
0 Comments