Type Here to Get Search Results !

चंदगड प्रशासनाकडून न्हावेली गावातील स्मशानभूमीचा विषय मार्गी.

चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील न्हावेली गावामध्ये बऱ्याच वर्षापासून स्मशानभूमीचा विषय प्रलंबित होता.अखेर हा विषय सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक लक्ष्मण गावडे व चंदगड प्रशासन यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे.50-60 वर्षापासून न्हावेली गावामध्ये स्मशानभूमीचा विषय प्रलंबित होता.फडणीस कुटुंबियांकडून काही वर्षांपूर्वी या स्मशानभूमी व शिवलिंग मंदिर यांच्यासाठी 5 गुंठे जागा देण्यात आली होती.त्यामुळे तशी नोंद ग्रामपंचायत उमगाव येथे आहे.पण नकाशा नसल्यामुळे नेमकी जागा कोणती द्यायची? हा प्रश्न फडणीस कुटूंबियांना होता.अखेर फडणीस कुटुंबीय,ग्रामस्थ व प्रशासन यांनी दुजोरा देत गावच्या भल्यासाठी एकत्र येत दोन्हीही बाजूने मार्ग काढला.


गेल्या महिन्यामध्ये स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध असल्यामुळे न्हावेली ग्रामस्थ स्मशानभूमी व्हावी यासाठी आग्रही होते.त्यामुळे त्यांनी स्मशानभूमीसाठी जागा मिळावी याकरिता चंदगड प्रशासनाकडे मागणी केली होती.अखेर प्रशासनाने याची दखल घेत गावांमध्ये भेट दिली.व दोन्ही बाजू ऐकून त्यातून योग्य मार्ग काढून हा विषय मार्गी लावण्यात आला.स्मशानभूमी येथील जागा ही फडणीस यांच्या मालकीची होती.त्यामुळे अखेर फडणीस यांनी प्रशासनाच्या सहकार्याने योग्य जागा देण्याचे मान्य केले असून तीन गुंठे जागा पुरातन मंदिर व दोन गुंठे जागा स्मशानभूमीसाठी द्यायला तयार झाले.त्यामुळे हा विषय मार्गे लागला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे,पोलीस निरीक्षक विश्वास पाटील,नायब तहसीलदार हेमंत कामत,महाराष्ट्र माझाचे संपादक ज्ञानेश्वर पाटील,
पोलीस पाटील मनोज गावडे,सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सावंत,लक्ष्मण पाटील,अशोक पेडणेकर,रुकमाना गावडे,राम गावडे, विठ्ठल गावडे, पांडुरंग शेडगे, शाम फडणीस,गुरु फडणीस,पांडुरंग गावडेसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments