चंदगड/प्रतिनिधी : देवरवाडी (ता. चंदगड) येथील प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंथी वैजनाथ मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त दवना उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.या उत्सवाला महाराष्ट्र व सिमा भागातील असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.या सोहळ्यासाठी मंदिर परिसर विशेष फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आले असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय पाहायला मिळत आहे.
उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे देव वैजनाथ आणि माता आरोग्य भवानी यांचा पावन विवाह सोहळा. हा विवाह ११ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३५ वाजता पार पडणार आहे.१२ एप्रिल रोजी मंदिरात भव्य यात्रा भरवण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर१३ एप्रिल रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पवित्र दवना उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
Post a Comment
0 Comments