चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यात माजी आमदार राजेश पाटील यांनी विकासकामांचा सपाटा लावला असून लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांनी वरिष्ठ पातळीवर निधी मंजूर करून आणत तालुक्यातील विकासाला चालना दिली आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधी असताना शेवटच्या टप्प्यात राहिलेली कामे व आताची मंजूर विकासकामे विविध ठिकाणी चालू आहेत.एक आदर्श व संयमी लोकप्रतिनिधी कसा असावा हे राजेश पाटील यांनी आपल्या कार्यातून नेहमी दाखवून दिले आहे.
तेऊरवाडी येथील गावातून ब्रह्मदेवालय पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणेसाठी एकूण २० लाख निधी माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला.या रस्त्याच्या कामांचा शुभारभ व चर्चमधील सुशोभीकरण करणे यासाठी १० लाख निधीच्या कामांचा लोकार्पण सोहळा चंदगड मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक पाटील,एस.एल.पाटील,सरपंच मनिषा पाटील,उपसरपंच प्रकाश दळवी,गोविंद मेनसे,राजेंद्र पाटील,संतराम मांग,सुरेखा पाटील,माया पाटील,रेखा भिंगुडे, दत्ता पाटील,मारुती पाटील,राजेंद्र भिंगुडे,राजाराम पाटील,यलाप्पा कांबळे,पिराजी हेंडोळे, सुबराव पाटील,संजय गडकरी,नागोजी मोकाने,संजय पाटील,सुनील पाटील,जॉन लोबो तसेच महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments