चंदगड/प्रतिनिधी : राज्यात घेण्यात आलेल्या SSC बोर्ड परीक्षेमध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल सुरूते शाळेने घवघवीत यश संपादन करत शाळेचा 100 % निकाल प्राप्त केला आहे.
महादेव परशराम नाईक (शाळेत प्रथम क्रमांक)
या परीक्षेमध्ये 18 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये महादेव परशराम नाईक याने 89.20% मार्क मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकाविला.अत्यंत शांत व हुशार गरीब कुटुंबातला विद्यार्थी असून त्याला त्याचे आई-वडिलांचे तसेच त्याचे काका सट्टूप्पा परशराम नाईक यांचे योगदान लाभले. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा 100% निकाल लागला असून या शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा अखंडीत ठेवली आहे.या यशामध्ये सर्व विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments