Type Here to Get Search Results !

तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयाकडून 100% निकालाची परंपरा कायम.

चंदगड/प्रतिनिधी : राज्यात मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या SSC बोर्डचा निकाल लागला असून अनेक शाळांनी 100% गुणवत्ता ठेवण्याची परंपरा चालू ठेवली आहे.या परीक्षेमध्ये तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन करत शाळेचा 100 % निकाल प्राप्त केला.त्यामध्ये शाळेतून परीक्षेत 25 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा 100% निकाल लागला असून या शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा अखंडीत ठेवली आहे.


या यशामध्ये सर्व विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष प्रा.एन्. एस्. पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक एम्. बी. पाटील सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


यशवंत विद्यार्थी-

श्रावणी नारायण बुच्चे -95.80% 

भूमिका सुरेश हेंडोळे - 94.20% 

तुषार सुरेश पाटील - 92.40% 

दिशा लक्ष्मण भिंगुडे - 90.80% 

साक्षी सुरेश भिंगुडे - 89.80%

सोहम दीपक पाटील  - 86.40%

चैत्राली नागोजी पाटील - 86.00%

गौतम शिवाजी कुंभार - 84.00% 


Post a Comment

0 Comments