नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : समाजसेवक नरसू शिंदे आपल्या संस्थेमार्फत समाजातील विविध घटकांना आपली आर्थिक परिस्थिती सामान्य असूनही आपल्या परीने घडेल ते सहकार्य करण्याचे अविरत प्रयत्न सुरू ठेवले आहेत.अशा ह्या समाजसेवकाला सर्वांनी आर्थिक पाठबळ देण्याची गरज असल्याचे मत अखलकभाई मुजावर यांनी कोळींद्रे येथे महिला रोजगार मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.स्वागत सुरेश बुगडे यांनी करून प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना राष्ट्रीय प्रशिक्षक आर वाय पाटील म्हणाले की,आपल्या गावात महिलांसाठी विविध उद्योगधंदे सुरू करून त्यांना रोजगार मिळवून देणार असल्याचे सांगितले.तर के डी सी बँकेचे शाखाधिकारी विजय कांबळे बोलताना म्हणाले की,लाडक्या बहिणीसाठी ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.तसेच कार्यक्रमामध्ये शाहीर विष्णू पाटील,सदानंद शिंदे यांनी शाहिरी गीतांचे गायन झाले.यावेळी नरसू शिंदे,उद्योजिका लता रेडेकर,गीता जेधे कोल्हापूर जिल्हा महिला उपप्रमुख,महेश लाखे कोल्हापूर जिल्हा संघटक,जयराम संकपाळ संचालक आजरा तालुका संघ व संस्थेचे सर्व संचालक हजर होते.
Post a Comment
0 Comments