Type Here to Get Search Results !

देवस्थान जमीन लागण रक्कम जमा करण्यासाठी शिबिराचे आयोजन.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : गडहिंग्लज व चंदगड तहसील कार्यालय येथे देवस्थान जमीनसंदर्भात 22 मे ते 23 मे रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर विभागाच्या अधिपत्याखाली सुपूर्द केलेल्या देवस्थानच्या जमिनी जे शेतकरी कसतात,त्या जमिनीची लागण रक्कम जमा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार ऑफिस येथे 19 मे ते 10 जून अखेर शिबिरे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन समितीने दिले आहे.ज्या लागण शेतकऱ्यांना लागण रक्कम जमा करायचे आहे,त्यांनी संबंधित कागदपत्रे घेऊन तहसीलदार कार्यालय येथे उपस्थित राहून लागण रक्कम जमा करावी. ज्या शेतकऱ्यांनी समितीकडे लागण रक्कम जमा केली नसल्यास सन 1990 - 91 ते आज अखेरचे सातबारा उतारा व ज्यांनी भरणा केला असेल नमूद केलेल्या सालापासून ची पावती व सातबारा आणणे आवश्यक आहे. लागणदार शेतकरी मयत झाल्या असल्यास मयत दाखला व वारसा दाखला घेऊन येणे. तसेच ज्या लागनदार शेतकरी यांनी गाव कामगार तलाठी त्यांच्याकडे रक्कम जमा केले असल्यास च्या पावतीच्या छायांकित प्रती आणावे. वरील प्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तहसीलदार ऑफिस येथे हजर राहून सहकार करण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

Post a Comment

0 Comments