चंदगड/प्रतिनिधी : अंगणवाडी सेविका पुरत्या मर्यादित न राहता गावामध्ये दारूबंदी, रात्रीच्या शाळेच्या माध्यमातून महिलांना सज्ञान करणे, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण, विना मोबदला खाजगी शिकवणी,कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणे या सारखे सामाजिक कार्य सुधाताईंनी करत तरुण पिढीला आणि खास करून महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असं काम केलं आहे,असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र माझाचे पत्रकार श्रीकांत नेवगे यांनी काढले.ते अंगणवाडी सेविका सुधा विष्णू डांगे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलत होते.सुधा विष्णू डांगे यांच्या 24 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्याने सेवानिवृत्ती विषयक सत्कार सोहळा ग्रामस्थाच्य माध्यमातून पार पडला.
या कार्यक्रमांच्या अध्यक्षा सरपंच लक्ष्मी घोळसे होत्या.शिरोली सरपंच पांडुरंग देवलकर,अतिश पाडले,रामचंद्र रेंबळे, विश्वास डांगे, तानाजी बोकडे,उदय भिगुर्डे, राजाराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी उपसरपंच राजाराम पाटील, माजी सरपंच रेखा देवळे, लता घोळसे, समीक्षा इंगवले, सुनीता पाटील,राजाराम पाडले, रामभाऊ पाटील, मारुती कुडाळकर, जोतिबा गोते, तानाजी कोंडुसकर, विष्णु पाटील, मारुती घोळसे,शंकर कुडाळकर,बंडू गोळसे, प्रकाश कोले, गोविंद डांगे, प्रताप नेवगे,प्रशांत सावंत, मोहन पवार,प्रदीप साबळे, नामदेव नार्वेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.आभार वैभव डांगे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments