Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांनी आपला सातबारा आधारशी लिंक करावा-तहसीलदार राजेश चव्हाण

 

चंदगड/प्रतिनिधी: चंदगड तालुक्यातील 'अ‍ॅग्रीस्टॅक योजना' अंतर्गत आपला 7/12 दस्तऐवज आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळेल. ज्यामुळे भविष्यातील सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला सातबारा लिंक करा असे आवाहन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.जर ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास, शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.


फार्मर आयडीसाठी आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सर्व 7/12 चे 8 अंकी उतारे आवश्यक असून ही प्रक्रिया 25 मे  पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्यथा शेतकऱ्यांना शासकीय लाभ मिळणार नाही. जर कोणतीही अडचण असल्यास गावातील तलाठी / ग्रामसेवक / कृषीसेवक यांच्याशी संपर्क साधावा असे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments