चंदगड/प्रतिनिधी : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी 25 मे रोजी डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज चंदगड रोड गडहिंग्लज या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. चंदगड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे व सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या निमित्ताने इतरत्र शोधाशोध करत आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्धात हेतूने चंदगड आजरा गडहिंग्लज या तालुक्यातील तरुणांना नोकरी मिळावी याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या व बाहेरील कंपन्या यामध्ये सहभागी होणार असून यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.त्याचबरोबर सुशिक्षित तरुण तरुणी नोकरीच्या शोधात न लागता छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू करावे याकरता कौशल्य विकास मार्फत वेगवेगळ्या उद्योगधंद्यांच्या बाबत मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर तरुणांना परदेशी शिक्षणाची माहिती मिळावी तसेच प्रदेशांमध्ये जाऊन नोकरी ची संधी कशी उपलब्ध होईल याबाबत या रोजगार मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे याकरता देखील स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष करण्यात आलेला आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कंपन्यांचा सहभाग आहे त्यामुळे बऱ्याचशा तरुणांना घरातून ये-जा करून नोकरी करता येणार आहे यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्याला योग्य वाटत असेल अशा कंपनीची निवड करून आपण आपल्या आयुष्याचा मार्ग सुकर करावा असे आवाहन केले.
Post a Comment
0 Comments