चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील न्यू हायस्कूल अलबादेवी येथे स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.'आम्ही तुम्हाला विसरलो नाही,तुम्ही आमच्या स्मरणात आहात'असा बोध सांगणारा हा स्नेहमेळावा 25 वर्षांनीही तेवढ्याच दिमाखात संपन्न झाला.
दहावी 2001नंतर रुपेरी 25 वर्षांनी वयाच्या 40 व्या वर्षी पुन्हा एकदा शाळेत यायचं,आपल्या मित्रांचा स्नेह वाढवायचा, जून्या आठवणींना उजाळा द्यायचा तसेच गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन ऋणानुबंध ठेवायचा म्हणून अनेक अडचणीवर मात करत,वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी काम करत एकत्र आणण्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले आणि एकत्र आले 25 वर्ग मित्रमैत्रिणी....
व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हॅलो-हाय,शुभ सकाळ, शुभ रात्री हे सगळं दुरुन करत असतोच.दोन मित्र भेटले की शाळेची-शिक्षकांची आठवण काढतो,पण शिक्षकांना सांगायचा कधी योग येत नाही म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकालाही संधी मिळते.आभार, ऋण ,सदिच्छा असं बरंच काही आपल्या शिक्षकांप्रती व्यक्त करत,मित्र-मैत्रीणीच्या स्नेहामध्ये गुरुजनांसोबत आनंद दिवस साजरा केला.स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या समोर आठवणींचा डोंगर आपल्या मनोगतातून उभा केलात.शाळेत मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर कष्टाचे बाळकडू घेऊन भरारी घेत असताना आपल्या शाळेचं ,मित्रांचं काही तरी देणं लागतो हा उद्देश ठेऊन एकमेकांना मदत करण्यासाठी पुन्हा एकत्र येत हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्नेह मेळाव्यास 2000-01 सालचे दहावीचे माजी विध्यार्थी-विध्यार्थिनी हजर होते.तर न्यू हायस्कूल अलबादेवी मुख्याध्यापक व्ही.एस.कोले,शिक्षक श्री.पाटील,ए.एन.श्री. बोकडे,टी.जी.श्री. कांबळे,व्ही.एल.श्री. नौकुडकर,श्री. पाटील,श्री. नाईक,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments