Type Here to Get Search Results !

जयसिंगपूर पोलीस गुन्हे शोध पथकाने कर्नाटकातील दोन सराईत आरोपीना केले जेरबंद.


कोल्हापूर/प्रतिनिधी : जयसिंगपूर राजीव गांधीनगर येथील राजू लक्ष्मण गोसावी यांच्या मालकीच्या चिपरी बेघर वसाहतीतील आर.जी.ट्रेडर्स स्क्रॅप मर्चंट दुकानातील 225 किलो कॉपर धातू व मोटार सायकल चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर तपास सुरु असताना जयसिंगपूर पोलीस पथकाला गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीनुसार जयसिंगपूर MIDC येथील अकिवाडे इंडस्ट्रीज परिसरात दोन इसम सिल्वर रंगाची चारचाकीत कॉपर धातूचा मुद्देमाल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार सापळा रचून तपास केला असता दोन संशयित चोरांना वरील चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.


यामध्ये मुकेश गणपती गोसावी उर्फ जाधव,उमेश गणपती गोसावी जाधव रा.बदर गल्ली, पिरनवाडी ता.खानापूर,बेळगाव येथील दोघे आरोपी हे सक्खे भाऊ असल्याचे निष्पन्न झाले.सिल्वर रंगाच्या वॅगनर MH02 AK 3188 चारचाकीत अंदाजे 225 किलो कॉपर धातूचे बंडल आढळून आले. व सदरील चोरी ही आर जी ट्रेडर्स स्क्रॅप मर्चंट येथून केल्याचे आरोपीनी कबूल केले.यापूर्वीही या दोन आरोपीवर विविध गुन्हे नोंद असून कुपवाड, विश्रामबाग सांगली, शिरोळ, हातकणंगले, शिवाजीनगर, मुरगूड पोलीस ठाणे कोल्हापूर आणि अलिबाग, खालापूर रायगफ येथे या सराईत आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.एकंदरीत, अवघ्या 8 तासात शोध लावून आरोपीना पकडल्यामुळे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, अंमलदार ताहीर मुल्ला, अभिजित भातमारे, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments