Type Here to Get Search Results !

बेळगाव-वेंगुर्ला रस्ता रुंदीकरणासाठी शिवसेनेचा पाटणे फाट्यावर रास्ता रोको.

(वर्षभरात काम न झाल्यास शिवसेना उग्र आंदोलन करणार-प्रा. सुनील शिंत्रे)


चंदगड/प्रतिनिधी : बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करत शिवसेनेच्या वतीने पाटणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. रस्त्याची दयनीय अवस्था, अपघातांची मालिका आणि प्रशासनाची उदासीनता याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.


प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, “वर्षभरात रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सैल सोडणार नाही. चंदगड तालुक्याची ओळख जिल्ह्यात न्हवे तर महाराष्ट्रात असून या बाबतीत प्रशासन एवढं उदास का असा सवाल त्यांनी उपस्थित केला,चंदगड तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असून, झालेले अपघात याला शासन जबाबदार असून यापुढे असेच अपघात झाल्यास शिवसेना परत रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला,  चंदगड विधान सभा प्रमुख राजू रेडेकर म्हणाले,चंदगड तालुका हा आता सुजलाम सुफलाम झालेला आहे शिवसेनेच्या काळात धारण झाल्यामुळे शेती सगळी हिरवीगार झालेली आहे,तालुक्यात असाच प्रमाण वाढल्यामुळे तीन ऊस कारखाने कार्यरत आहेत,त्यामुळे दळण वळनाचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे आठवड्याला एक अपघात होत असून लोक मृत्यूमुखी पडत आहेत,त्यामुळे रस्ता रुंदीकरन होऊन होणारी जीवित हानी वाचवणे गरजेचे आहे.


ऍड.संतोष मळविकर यांनी आरोप करत सांगितले की, "रस्ता पूर्ण झाला तर अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करता येणार नाही म्हणूनच रस्ता दुरुस्ती जाणीवपूर्वक थांबवण्यात आला आहे. येत्या काळात या रस्त्यावरील खर्चाचा प्रत्येक पैशाचा तपशील मागवण्यात येईल.”


यावेळी शिवसेचे विष्णू गावडे यांनी आपण लहानपणसून या रस्त्यावर वावरत असून दिवसेंदिवस रस्ता अरुंद होत असून अपघाताचे प्रमाण या मुळे वाढत चालले आहे,रस्ता रुंदीकरण करणे ही काळाची गरज आहे असे सांगितले, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील,  गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, राजू रेडेकर यांचीही भाषणे झाली.  आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली.


शेवटी,आंदोलनकर्त्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. मुल्ला यांनी स्वीकारले.या प्रसंगी विक्रम मुतगेकर, अवधूत पाटील,किरण नागुर्डेकर,उदय मंडलिक,महेश पाटील, भरमु बिर्जे,कार्तिक सुतार, दयानंद रेडेकर,अशोक पाटील,अनिल फडके,अनिल फडके, मोहनगेकर,अवधूत भुजभळ, ज्ञानेश्वर माने,तानाजी पाटील,मनोज रावराणे,कल्लाप्पा सुळेभावकर,प्रवीण कोळसेकर,  शिवा अंगडी, बाबू चौगले,श्रीधर भाटे, कल्पेश पाटील, तुकाराम पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments