चंदगड/प्रतिनिधी : तांबुळवाडी (ता. चंदगड ) येथे गावातील एका खाजगी वायरमनला हाताशी धरून मीटरधाऱकांच्या परवानगीशिवाय महावितरण कंपनीने मिटरच्या कार्यप्रणालीविषयी ग्राहकांना माहिती न देताच त्यांच्या ठेकेदाराकडून गावात सर्वांचीच मोफत( फुकट ) स्मार्ट डिजिटल मीटर बसवित आहोत असे सांगून गावाबाहेरील २६ मीटर बसविलेली आहेत.हे समजल्यानंतर गावात तात्काळ ग्रामसभा बोलावून स्मार्ट डिजीटल मीटर बसविण्यास विरोध करून बसविलेली मीटर ताबोडतोब काढून न्यावीत असा ठराव करण्यात आला.
यावेळी माजी प्राचार्य आर.आय.पाटील यांनी जर टी.ओ.डी. मीटर म्हणजे टाईम ऑफ डे मीटर बसविल्यास दिवसाच्या वेळेनुसार विजेचा दर बदलत असतो. सामान्यता पीक घंटे(वेळ) म्हणजे संध्याकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत विजेचा दर सर्वात जास्त असतो व ऑफ पीक वेळेत विजेचा दर कमी असतो.म्हणजे ग्राहकांने संध्याकाळी ५ ते रात्री ११पर्यत व सकाळच्या सत्रात विज वापरल्यास जास्त दर त्यामुळे घरात शुभकार्य , सणासुदीच्या दिवसात विज वापरावर बंधने येणार आहेत. तसेच अगोदरच महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा विजेच्या युनिटचा दर जास्त असून टीओडी स्मार्ट डिजिटल मीटर बसविल्यास ग्राहकांना नाहक बुर्दंड बसणार आहे . सध्या मीटर भाडे पोस्टपेड आहे पण भविष्यात मोबाईल रिचार्ज प्रमाणे प्रीपेड सक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी सर्वच मीटर धारकांनी स्मार्ट डिजीटल मीटर बसविण्यास महावितरण कंपनीला विरोध करणे गरजेचे आहे असे आवाहन चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव आर.आय. पाटील यांनी केले आहे.
याप्रसंगी श्रीनिवास पाटील ग्रामपंचायत सदस्य पी.एन. पाटील यानी आपली मनोगते व्यक्त केली.या ग्रामसभेला अरुण आप्पाजी पाटील,उपसरपंच संजय महादेव पाटील , ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निंगोजी पाटील , नागोजी भोसले ,शरद पाटील, धनाजी पाटील , शंकर जैनू पाटील ,जयवंत सावंतसह गावातील सर्व मीटर धारक व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार पुंडलिक सावंत यांनी मानले.
Post a Comment
0 Comments