चंदगड/प्रतिनिधी : सुंडी,करेकुंडी,बुक्कीहाळ मार्गे कोवाड ते चंदगड या गावांना आजतागायत बस सुविधा उपलब्ध झालेली नाही.त्याचबरोबर या गावातील लोकांना शासकीय कामे, वैद्यकीय सुविधा, बँकेची कामे व विद्यार्थांना प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी कोवाड या ठिकाणी सतत ये- जा करावी लागते परंतू बस सेवा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय झाली आहे.त्यामुळे आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सुंडी, करेकुंडी, बुक्कीहाळ मार्गे कोवाड चंदगड एस.टी. बस कायमस्वरूपी चालू करावी या मागणीचे निवेदन चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांना देण्यात आले.
या निवेदनावर जोतिबा मारूती बिर्जे ( सरपंच, बुक्कीहाळ), पार्वती बिर्जे (ग्रा.सदस्या, बुक्कीहाळ), प्रकाश केदनूरकर (सरपंच, कौलगे), सटूपा मेणसे (पो.पाटील, कौलगे), आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.तर निवेदन देताना बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते गजानन तरवाळ, अमित सुळेकर, लक्ष्मण पांडुरंग कांबळे, प्रफुल्ल कांबळे, महादेव कांबळे हे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments