Type Here to Get Search Results !

उद्या शिक्षण विस्तार अधिकारी एन. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक गौरव सोहळा.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : चंदगड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी नारायण विठोबा पाटील तथा एन. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक गौरव सोहळा रविवार दिनांक १ जून रोजी सकाळी १०  वाजता कोवाड येथील पद्मश्री रणजीत देसाई सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.                


या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनाजी कृष्णा पाटील(अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चंदगड ) हे असणार आहेत.तर पाटील दाम्पत्यांचा सत्कार शिक्षक समितीचे राज्य नेते शंकरराव मनवाडकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.यावेळी विशेष सत्कारमूर्ती म्हणून गुरुवर्य बी.एस.अंगडी( माजी शिक्षण विस्तार अधिकारी,पंचायत समिती गडहिंग्लज) यांचा सत्कार होणार आहे.या कार्यक्रमासाठी सुमन सुभेदार, एम जे पाटील, कल्लाप्पा  भोगण, शांतारामबापू पाटील, वैभव पाटील, जी वाय कांबळे, अनिल ओमासे, दीपक कामत, रवी कुमार पाटील,  शिवाजीराव चौगुले, प्रमोद तौदकर  यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या गौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments