चंदगड/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोवाड येथे पावसाळ्यात येणाऱ्या पूरपरिस्थितीत कसे सामोरे जायचे? या निमित्ताने ताम्रपर्णी नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पास रेस्क्यू टीम,चंदगडच्या वतीने बोटीचे व पुरात एकादी व्यक्ती अडकल्यास त्यांना कशी मदत करायची याची माहिती व प्रात्यक्षिक श्रीपाद सामंत व त्यांच्या टीमने दाखवले.
या प्रसंगी मंडल अधिकारी शरद मगदूम, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पाटील,शुभम मुंडे,ग्राम विकास अधिकारी नरेंद्र बेलीकटे, किरण माने,अक्षय कोळी,विशाल परब, प्रमोद खोराटे,रामदास पाटील,अविनाश गिलबिले व महसूल सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments