चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : अवकाळी पावसामुळे शेती,घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याची सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधीकारी, तालुका कृषी अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी येडगे यांनी सूचना देताना सांगितले की,जिल्ह्यात वादळी वारा व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत तसेच पथकांची नियुक्ती केली नसल्यास तातडीने आदेश निर्गमित करून उद्यापासून पंचनामे सुरू करण्यात यावे. संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अंतिम अहवाल जिल्हा कार्यालयास 31 मे 2025 पूर्वी सादर करण्यात यावा. जिल्ह्यातील निवारा केंद्राची जागा निश्चित करून आवश्यक सेवा व दुरुस्ती दोन दिवसात पूर्ण करून तसा अहवाल देण्यात यावा. तालुकास्तरावरील आपत्ती नियंत्रण कक्ष १ जून २०२५ पासून पूर्णवेळ कार्यरत ठेवावे. संबंधित कामकाज पाहणाऱ्यांचे फोन नंबर अद्यावत करण्यात यावे. आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, व इतर प्रतिष्ठित व्यक्तींचे मोबाईल क्रमांक अध्यायवत करून गावातील मीडिया ग्रुप वर पाठवावेत. त्याचबरोबर गाव पातळीवरील सर्व आवश्यक्य संपर्क क्रमांक तपासणी करून खात्री करावी. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे येथे पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यास वाहनांचे वाहतूक थांबवून तशा सूचनांचे फलक लावण्यात यावे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरील सुरक्षेची खबरदारी घ्यावी. इतर संभाव्य भूसखलन स्थळांची ही पाहणी करून संबंधित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करण्याची ही सूचना त्यांनी केली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments