चंदगड/प्रतिनिधी : मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत देवेंद्र फडवणीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा त्यांच्या डायलॉग मात्र त्यावेळी भरपूर गाजला होता. हाच डायलॉग सध्या चंदगड तालुक्यात लागु झालेला दिसत आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असच काही डायलॉग मारत चंदगड-बेळगाव रस्त्यावर खड्ड्यांचे आगमन झाले आहे.
मान्सून सुरू होण्याअगोदरच अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. चंदगड तालुक्यातील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत . ह्या अवकाळी पावसात मात्र मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे म्हणत रस्त्यावर खड्डयानी मात्र आपली हजेरी लावली आहे. एकीकडे बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सध्या ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच रस्त्यांचे रुंदी करून ते चांगल्या गुणवत्तेचे केले आहेत. पण वाहनांची संख्या वाढली तसेच अपघाताची संख्या देखील वाढली पण या बेळगाव- वेगुंर्ला रस्त्याच्या रुंदीकरणाविषयी काही हालचाली दिसत नाहीत. वेळोवेळी प्रवासी नागरिक तसेच विविध पक्षांच्याकडून बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यांच्या रुंदीकरणाबद्दल आंदोलन करत मागणी होत आहे. पण याकडे गांभीर्याने संबंधीत विभाग लक्ष्य देत नसल्याचे चर्चेतून ऐकावयास मिळत आहे. सद्यस्थिती पाहता रुंदीकरणाचा विषय नसला तरी ह्या मार्गावर काही ठराविक ठिकाणीच पडणाऱ्या खड्ड्यांचा बंदोबस्त मात्र कायमस्वरूपी करावा अशी मागणी वाहनधारकांची होत आहे.
Post a Comment
0 Comments