चंदगड/प्रतिनिधी : ईब्राहिमपूर ता.चंदगड सहदेव विठ्ठोबा हरेर यांचे सोमवार,दि.26 मे 25 रोजी,संध्याकाळी 4 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.ते गावातिल एक प्रतिष्ठित व्यक्तमत्व म्हणून प्रचलित होते.तसेच चंद्रकात लक्ष्मण गावडे (समाजसेवक)यांचे मोठे मामा होते.राजकीय क्षेत्रात गावामध्ये सत्तातर करत असताना हरेर कुटूंबियांचे योगदान राहिले आहे. त्यांचे भाऊ सुरेश विठ्ठोबा हरेर हे ग्रामपंचायत सदस्य होते.
सहदेव हे गावात कोणताही सामाजिक, धार्मिक कार्यक्रम असो, नेहमी अग्रनी राहून कार्यक्रम पार पाडायचे, तसेच मदतकाळात लोकांसाठी धावून जायचे.त्यांना भजनाची आवड असल्याने ते उत्तम माळकरी व विठ्ठलाचे भक्त होते.त्यामुळे सर्वजण त्यांना 'सहदेव बुवा' या नावाने हाक मारत.चदगड पंचक्रोशीत त्यांची चांगली ओळख होती.एकंदरीत त्यांच्या जाण्याने सामाजिक, धार्मिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.सहदेव हरेर यांच्या जाण्याने हरेर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.त्यांच्या जाण्याने पत्नी,दोन मुले,एक मुलगी,दोन सुनबाई,लहान नातवंडे असा परीवार आहे.
ऋण निर्देश -
आमचे वडील सहदेव विठोबा हरेर यांचे सोमवार दि.26 मे 2025 रोजी निधन झाले.या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ,नातेवाईक,मित्र परिवार,शैक्षनिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर ,सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य , ब्रम्हलिंग विकास संस्था व शिवराज शिक्षण संस्था यांचे पदाधिकारी व सर्व सदस्य,यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला.या सर्वांचे आमचा परिवार ऋणी आहे.
शोकाकुल परिवार -
पत्नी -सविता सहदेव हरेर
मुलगे-रामदास सहदेव हरेर,एकनाथ सहदेव हरेर,
भाऊ-सुरेश विठ्ठोबा हरेर व सर्व ग्रामस्थ, मित्रमंडळ व नातेवाईक परिवार
Post a Comment
0 Comments