चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : गोठ्यातील जनावरे धुत असताना विजेचा धक्का बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अडकूर येथे घडली.
प्राथमिक माहिती अशी कि,रवींद्र मनोहर सोनार (वय-24)राहणार अडकूर असे या मृत युवकाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे परीट ओढ्याजवळील रवींद्र हा आपल्या गोठ्याकडे गेला होता. यावेळी जनावरे धुत असताना अचानक विजेचा धक्का बसल्याने तो खाली कोसळला.जमीन ओली असल्याने त्याला सावरता आले नाही.त्यातच त्याचा जागी मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
Post a Comment
0 Comments