Type Here to Get Search Results !

प्रा. बी. एम.पाटील यांना पी.एच.डी पदवी.

चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बी.एम.पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयातील डॉक्टरेट तथा पी.एच.डी नुकताच प्राप्त झाली.त्यांनी 'सिंथेसिस अँड कॅरेक्टरायझेशन  ऑफ कॅल्शियम अँड नायट्रोजन डोपड झिंक ऑक्साईड  नॅनो पार्टिकल्स ॲज अ  फर्टीलायझर' या विषयावरती आपला शोधप्रबंध  शिवाजी विद्यापीठाला सादर केला होता.गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस ए. व्हनाळकर  व कोल्हापूर येथील न्यू कॉलेज कोल्हापूर येथील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी.डी कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. 


डॉ. बी एम पाटील हे गेली 27 वर्षे र. भा.माडखोलकर महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध आहेत.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, प्रा.ऍड.एन.एस पाटील, प्रा.आर.पी.पाटील तसेच खेडूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष खजिनदार,विश्वस्त व संचालक यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments