Type Here to Get Search Results !

अकिवाट व्यायामशाळा इमारतीसाठी ७ लाख मंजूर.

(भवानीसिंह घोरपडे सरकार यांचे विशेष प्रयत्न)


शिरोळ/प्रतिनिधी : व्यायामशाळा विकास अनुदान योजना(सर्वसाधारण) २०२४-२५ अंतर्गत अकिवाट ग्रामपंचायती इमारत बांधकामासाठी सात लाखांचा निधी मंजुर झाला आहे.यासाठी भवानी सिंग घोरपडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.याबाबतचे पत्र कार्यालयाकडून भवानी सिंग घोरपडे यांच्याहस्ते अकिवाट गावच्या सरपंच वंदना पाटील,उपसरपंच जाफर तहसीलदार व सदस्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.


राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,जतन,प्रसार व प्रचार व्हावा व त्या अनुषंगाने राज्यात क्रीडामय वातावरण निर्मिती व्हावी.यासाठी राज्याचे क्रीडा धोरण २०१२ व संदर्भिय शासन निर्णयानुसार,व्यायाम विकास अनुदान योजनेअंतर्गत,इमारत बांधकाम विकासाकरिता पात्र संस्थांना अनुदान वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.सन २४-२५ मध्ये  ग्रामपंचायतीने सादर केलेल्या प्रस्तावानुसार व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत सात लाखांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.यावेळी माजी सरपंच विशाल चौगुले,जयसिंगपूर कृषी उत्पन्न समितीचे सभापती आण्णासाहेब पाणदारे,टाकळी चे माजी उपसरपंच सुदर्शन भोसले,संतोष गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य शितल हळींगळे,आप्पासाहेब म्हैसाळे, अनिल वळवाडे,श्रीराम हुजरे,सुजाता बडबडे,सुनिता माने,सागर माने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments