Type Here to Get Search Results !

अथर्वचे कर्मचारी ईराप्पा हाजगुळकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न.

चंदगड/प्रतिनिधी : अथर्व दौलत कारखाना साखर कारखाना,हलकर्णी व अर्थव इंडस्ट्रीजचे कर्मचारी ईराप्पा गोपाळ हाजगुळकर हे 37 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाले.त्यामुळे अर्थव इंडस्ट्रीजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच न्हावेली येथे हाजगुळकर कुटुंबियांकडून सेवानिवृत्ती सोहळा पार पडला.



न्हावेली गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ईराप्पा गोपाळ हाजगुळकर हे नेहमी सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रिय असतात.त्यांनी अनेक वर्ष साखर कारखान्यात सेवा केली आहे.37 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ते अखेर सेवानिवृत्त झाले.यावेळी न्हावेली ग्रामस्थांकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर,माजी सरपंच रुकमाना गावडे, सुरेश गावडे, विठ्ठल गावडे, एकनाथ गावडे, सोमा गावडे,महादेव हाजगुळकर,शंकर गावडे,जयसिंग हाजगुळकर यांच्यासह मोठ्या संख्येने नातेवाईक,मित्रपरिवार,महिला,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments