गडहिंग्लज प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : राष्ट्र सेवा दल ही धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारांची पुरोगामी संघटना असून, आज धर्माधिष्ठित राज्याची प्रस्थापना करू पहाणार्या काळात राष्ट्र सेवा दलाचे काम गतिमान करण्याची गरज आहे.भारतीय संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी पुरोगामी विचारांच्या संघटनांवर आहे.जातीय-धार्मिक दंगली थोपवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.तरुणांची माथी भडकवण्याचे काम कांही धार्मिक संघटना जाणीवपुर्वक करीत आहेत, त्यामुळे तरुणांना राष्ट्र सेवा दलाशी जोडून घेण्याची गरज आहे. राष्ट्र सेवा दल, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समीती, समाजवादी व आंबेडकरवादी अशा समविचारी संघटनांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. अशा प्रकारची भूमिका राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ सेवक बाबा नदाफ, जिल्हाध्यक्ष रावसाहेब आलासे, धनंजय धोत्रे, अनिल होगाडे, अरविंद बारदेस्कर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. तसेच 11 जून 2025 रोजी कुरुंदवाड येथे होणार्या जिल्हा मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला.ते येथील साधना हायस्कूल मध्ये आयोजित राष्ट्र सेवा दल कोल्हापूर जिल्हा संवाद बैठकीत बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक गडहिंग्लज तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानराजा चिघळीकर तर आभार पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी सेवानिवृत्ती बद्दल शिवाजीराव होडगे तर मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल प्राचार्य साताप्पा कांबळे यांचा राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर बैठकीस राजनदादा पेडणेकर, बाळेश नाईक, ॲड. दिग्विजय कुराडे, साताप्पा कांबळे, उज्ज्वला दळवी, उर्मिला कदम, शिवाजीराव होडगे, आप्पासाहेब कमलाकर, सुरेश थरकार, बाळासाहेब मुल्ला, गणपतराव पाटोळे, सुरेश गुरव, हातीमखान पठाण, सुकन्या देवार्डे, सुमती सावंत, ईश्वर दावणे, सुरेश दास उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments