Type Here to Get Search Results !

सोमनाथ गवस यांची जिल्हा समन्वयक पदी निवड.

मुंबई/प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई यांच्या दिव्यांग ज्येष्ठ नागरीक विभागामार्फत कोल्हापूर जिल्हा समन्वयक म्हणून सोमनाथ गवस यांची निवड करण्यात आली आहे.खंडाळा येथे ७ व ८ जून या दोन दिवस झालेल्या ज्येष्ठ नागरिक कल्याण परिषद प्रशिक्षण कार्य शाळेत श्री.गवस यांची निवड जाहीर करण्यात आली.


यावेळी नियुक्तीचे पत्र देताना चव्हाण सेन्टरचे प्रशासकिय अधिकारी ॲड प्रमोद ढोकळे,श्रीदत्ता बाळ सराफ,बापू विजय कान्हेकर,श्रीगुमास्ते,डॉ.शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.श्री.गवस हे गेली १४ वर्षे ज्येष्ठ नागरिक कल्याण धोरणावर कार्य करतात,याची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments