Type Here to Get Search Results !

प्रफुल्लित मन आणि सुदृढ आरोग्यासाठी नियमित योग आवश्यक-आर.व्ही.ढेरे

 

चंदगड/प्रतिनिधी : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आणि फास्ट फूडच्या वाढत्या वापरामुळे मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. अशा काळात मन प्रसन्न आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योग ही एक अमोघ संजीवनी आहे," असे मत सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक आर. व्ही. ढेरे यांनी व्यक्त केले.ते रामपूर - बागिलगे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी. व्ही. पाटील होते.


या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ शिक्षक एम. एन. शिवणगेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. पुढे बोलताना आर. व्ही. ढेरे म्हणाले, "योगाच्या माध्यमातून केवळ शरीरच नव्हे तर मनही सकारात्मक आणि उत्साही ठेवता येते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे आवश्यक आहे." त्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिकही दिले व त्याचे फायदे उपस्थितांना समजावून सांगितले.मुख्याध्यापक टी. व्ही. पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "योग फक्त योग दिनापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या दिनचर्येचा भाग बनवावा. नियमित योगामुळे आरोग्य टिकते आणि जीवन अधिक समृद्ध होते."


सदर कार्यक्रमास सेवानिवृत्त शिक्षक आर. आर. पाटील, विद्यालयाचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आर. जी. शिवणगेकर यांनी केले.



---

Post a Comment

0 Comments